देहविक्री करणाऱ्या मुलींना अटक - Marathi News 24taas.com

देहविक्री करणाऱ्या मुलींना अटक


www.24taas.com, मुंबई
 
बुधवारी रात्री पोलिसांनी मुंबईत दोन ठिकाणी छापे मारून देहविक्री करणाऱ्या १८ मुलींना अटक करण्यात आली आहे. नागपाड्यातील कामाठीपुऱ्यात एका घरावर छापा मारून घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. या छाप्यात पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या १२ मुलींना अटक केली आहे.
 
घराचा मालक रियाज फरार झाला असून राजू नावाच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. रियाज याने घरात अनेक लहान लहान खोल्या केल्या होत्या. तो मुलींना  याच खोल्यांमध्ये ठेवत होता. आजही मोठ्या प्रमाणात कामाठीपुऱ्यात देहव्यापार सुरु आहे. मात्र पोलिसांना तो पुर्णपणे थांबविण्यात यश आलं नाही.
 
दुसरीकडे मुंबईतल्या बहरामबाग परिसरात ब्युटीपार्लरच्या नावखाली सुरु असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी ब्युटीपार्लरमधून दोन मुली आणि दोन ग्राहकांना अश्लील चाळे करताना अटक केली. ब्युटीपार्लरमधील ४ मुली आणि दोन ग्राहकांना आणि ब्युटीपार्लरच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

 

First Published: Wednesday, February 8, 2012, 08:25


comments powered by Disqus