Last Updated: Saturday, February 18, 2012, 13:18
www.24taas.com, मुंबई मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली. महापालिकेच्या आज लागलेल्या निकालात युतीने जेमतेम का होईना पण बहुमताकडे कूच केली. तर राज ठाकरेंच्या मनसेने गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवून जोरदार मुसंडी मारली. मात्र, त्यांना किंगमेकर होता आले नाही.
२२७ जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीचे शुक्रवारी सकाळपासून निकाल येण्यास सुरूवात झाली. कमी मतदानाचा फायदा युतीला होणार की आघाडीला होणार या चर्चेवर कालची उत्तररात्र रंगली होती.
मुंबईतील सत्तेची किल्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच असेल, असा अंदाज अगदी आज सकाळी दहा वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांतील मातब्बर व्यक्त करत होते. मात्र, निकालाचे जवळपास सगळे चित्र स्पष्ट झाल्यावर मनसेच्या या किल्लीची गरज निदान मुंबई आणि ठाण्यात तरी भासणार नाही, अशी स्थिती आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष-भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या महायुतीने हे दोन्ही गड राखण्यात यश मिळविले आहे.
मुंबई नजिकच्या उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप-आरपीआयची सत्ता असणार आहे.नाशिकमध्ये मात्र अपेक्षेप्रमाणे मनसे जोरदार मुसंडी मारत आपणचा किंगमेकर असल्याचे दाखवून दिले आहे. याठिकाणी छगन भुजबळ यांना जोरका झटका बसला आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आपणच दादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले आहे. तर नागपूरमध्ये भाजपने आपलं कमळ फुलवलं आहे. त्याठिकाणी सत्तेची किल्ली भाजपकडे असणार आहे. सोलापूर आणि अमरावतीमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी हाताची साथ मिळाली.
जिल्हा परिषदेत कोणाची किती ताकदअहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोकणात रायगडमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत नंबर एकचा पक्ष असल्याचे दाखवून दिले असले तरी शिवसेना-शेकाप- भाजप-आरपीआय या महायुतीने सत्ता काबीज केली आहे. तर कोल्हापूर, लातूर, नांदेड तर कोकणातील सिंधुदुर्गात काँग्रेसने सत्तेची किल्ली आपल्याकडे ठेवली आहे. याठिकाणी सर्व विरोधक नारायण राणे यांच्याविरोधात उतरले होते. मात्र, कोकणचा दादा आपणच असल्याचे दाखवून दिले आहे. हा निकाल विरोधकांसाठी आत्मपरीक्षण करणारा ठरणारा आहे.
ठाणेमध्ये जरी राष्ट्रवादीने मुसंडी मारली तर याठिकाणी त्रिशंकू परिस्थिती आहे. तर कोकणात रत्नागिरीत पुन्ही शिवसेनेने आपला गड कामय राखला आहे. तर बहुचर्चित बीड जिल्हा परिषदेत भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांनी आपली एक हाती सत्ता काबूत ठेवली आहे. याठिकाणी पुतने आणि भाऊ अण्णा पंडित यांना पराभवाचा धक्ता दिला आहे. आपणच किंगमेकर असल्याचे दाखवून अजित पवार यांना धोक्याचा इशारा दिला आहे.
पाहा सविस्तर निकाल
First Published: Saturday, February 18, 2012, 13:18