मध्य रेल्वे साठीच्या घरात - Marathi News 24taas.com

मध्य रेल्वे साठीच्या घरात

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईमध्ये रेल्वे म्हणजे सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य झालेला आहे. रेल्वे सेवा ही मुंबईची लाईफ लाइन समजली जाते. याच मुंबईच्या मध्य रेल्वेला आज तब्बल ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सीएसटी स्टेशन परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.
 
मध्य रेल्वेला आज ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सीएसटी स्टेशनचा परिसर विद्युत रोषणाईनं झगमगून गेला. १८५३ मध्ये सर्वात आधी मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाली. नंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्यानं झाला. नोव्हेंबर १९५१ साली मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. आज लोकल ही मुंबईकरांची जीवन वाहिनी बनली. लाखो प्रवासी दररोज नोकरी-कामधंद्यानिमित्त मुंबई आणि उपनगरात प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली.

First Published: Saturday, November 5, 2011, 07:23


comments powered by Disqus