Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:47
झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांना गुलामासारखं वागवणारे अधिकारी एस. एम. मोर्या यांची मनसे कार्यकर्त्यांनी धुलाई केली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मौर्यांनी आपल्या तबेल्यात कामाला जुंपल्याची धक्कादायक माहिती झी 24 तासनं समोर आणली. या मुजोर अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला या कामगारांची माफी मागायला लावली...
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घरच्या जनावरांच्या गोठ्यात राबवून घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची नेरळच्या मनसे कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली. नेरळचा रेल्वे सिनिअर सेक्शन इंजिनिअर एस. एम. मौर्या कामगारांची पिळवणूक करीत असल्याची धक्कादायक माहिती झी 24 तासनं समोर आणली होती. झी 24 तासच्या वृत्तानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी मौर्याला गाठून त्याच्या तोंडाला काळं फासलं. शिवाय भरचौकात आणून त्याला उठाबशा काढायला लावत मारहाणही केली.
गेल्या अनेक वर्षांपासून मौर्या घरच्या गोठ्यात रेल्वे कर्मचाऱ्य़ांना राबवून घेतो. अशा या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली.
First Published: Saturday, November 5, 2011, 13:47