झी मीडिया इम्पॅक्ट: कोटमची उलट प्रथा, झाली सुलट!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 15:36

झी मीडियाच्या वृत्तामुळं येवल्याच्या कोटमगावात वर्षानुवर्षे सुरु असलेली उलटं टांगण्याची अनिष्ट प्रथा बंद झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रौत्सवादरम्यान कोटमगावातल्या जगदंबा माता मंदिरात बायकांना उलटं टांगत नवस फेडण्याची प्रथा सुरु होती.

झी मीडियाचा दणका: डॉन बॉस्को शाळेची होणार चौकशी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 11:25

माटुंगामधल्या डॉन बॉस्को शाळेला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. हा गैरप्रकार तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच शिक्षण अधिकाऱ्यांकडून डॉन बॉस्को शाळेत चौकशीही करण्यात येतेय.

गुगलचं भारतीयांना आव्हान...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:09

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

झी २४ तास `इम्पॅक्ट`: धावपटू अंजना ठमकेच्या घरी `नॅनो`

Last Updated: Thursday, March 28, 2013, 16:47

नाशिकमधील धावपटू अंजना ठमके हिच्या घरी अखेर नॅनो आली आहे. उत्तर प्रदेशात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिला ही कार बक्षिसाच्या रुपात मिळाली होती.

झी २४ तास इम्पॅक्ट: डायनामिक्स डेअरीचं पाणी रोखलं

Last Updated: Monday, March 11, 2013, 22:07

बारामतीच्या डायनॅमिक्स डेअरीला पाणी द्यायला पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी मनाई केलीय. याबाबतीतचं वृत्त झी 24 तासने दाखवलं होतं. त्याची दखल घेत डायनॅमिक्सला उजनीतून पाणी उचलता येणार नाही असे आदेश दिले आहेत.

वस्तीगृहात विद्यार्थ्यांचे हाल

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 21:35

रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणा-या हालअपेष्टा झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. प्यायलाही दुषित पाणी...दोन वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही...

झी २४ तास इम्पॅक्ट, नद्यांच्या गटारगंगेवर उपाययोजना

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 21:02

पिंपरी चिंचवडमध्ये नद्यांची अक्षरशः गटारगंगा झाल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं. त्यानंतर महापालिकेला जाग आलीय आणि अखेर नद्यांमधली जलपर्णी काढण्याचं महापालिकेला सुचलं आहे.

‘झी २४ तास’चा दणका... मनसेची माघार!

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 11:17

मासिक पाळी सुरू असताना महिला कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होऊ शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडू प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी करणाऱ्या मनसेनं आता माघार घेतलीय.

लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश

Last Updated: Thursday, August 23, 2012, 12:10

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. `लेक लाडकी` अभियानांतर्गत वर्षा देशपांडेंच्या सहकार्याने हा पर्दाफाश करण्यात आला.

'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 09:06

‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर नवी मुंबईतल्या सिडको भवनात फायर ऑडिट झालं. शिवाय इमारतीमधल्या कुचकामी कालबाह्य अग्निशमन उपकरणंही तातडीने बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.

झी २४ तास इम्पॅक्ट- यादव गायकवाड निलंबित

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:58

पुण्यात येरवड्याच्या निवासी शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा मुख्याध्यापक यादव गायकवाड याला निलंबित करण्यात आलंय. झी २४ तासनं याबाबतचं वृत्त सर्वप्रथम दाखवलं होतं.

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:14

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 21:06

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.

मुरबाडी नदी प्रदुषित

Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:16

मुरबाड तालुक्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्याचवेळी मुरबाडकरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मुरबाडी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालीय.

वडापाव आणि दारूचा पेग, झी २४ तासचा दणका

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:11

नांदेडमध्ये भरचौकात हातगाड्यांवर दारुची अवैधपणे विक्री करण्यात येते. वडापावच्या गाड्यांवर दारुची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अनेक मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात.

ऍथलिट सनी पाटीलला मदतीचा हात

Last Updated: Friday, November 18, 2011, 08:21

उरणच्या ऍथलिट सनी पाटीलची संघर्ष कथा झी चोवीस तासानं सर्वप्रथम जगासमोर आणली. झी चोवीस तासनं दाखवलेल्या वृत्तानंतर या होतकरू ऍथलिट्च्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. मनसे आमदार राम कदम यांनी ट्रस्टच्या माध्यामातून सन्नीला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

मनसे दणका, रेल्वे अधिकाऱ्याला चांगलेच धुतले

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:47

रेल्वे कर्मचाऱ्यांना गुलामासारखं वागवणारे अधिकारी एस. एम. मोर्या यांची मनसे कार्यकर्त्यांनी धुलाई केली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मौर्यांनी आपल्या तबेल्यात कामाला जुंपल्याची धक्कादायक माहिती झी 24 तासनं समोर आणली.

झी २४ तासच्या दणक्याने जमीन घोटाळा उघडकीस

Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:48

उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाभिमान सबलीकरण योजनेत झालेल्या घोटाळ्याचा झी २४ तासनं पदार्फाश केला आहे. घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबड़ून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याच्य़ा चौकशीसाठी समिती नेमली आहे.