Last Updated: Thursday, February 23, 2012, 10:35
www.24taas.com, मुंबई मुंबईतील रे रोड परिसरातल्या गणेश बारवर छापा, वेटर्स सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलींसह १५ जणींना अटक, मॅनेजरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रे रोड परिसरात गणेश बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा टाकून १५ मुलींची सुटका केली. यात तीन मुली अल्पवयीन असल्याचा संशय आहे. गणेश बारमध्ये वेटर्स सर्व्हिसेसच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर कारवाई करण्यात आली. बारच्या मॅनेजरसह सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. बारमधून २३ हजार रुपये जप्त करण्यात आले.
First Published: Thursday, February 23, 2012, 10:35