Last Updated: Thursday, February 23, 2012, 12:41
www.24taas.com, मुंबई रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्रकाश मेहता यांचे स्वीय सहाय्यक सचिन पवार यांनी रिपाइंच्या उमेदवारा विरोधात प्रभाग क्रमांक १२६ रमाबाई नगरमधून बंडखोरी केली होती. सचिन पवारांच्या बंडखोरीमुळे रिपाइं उमेदवाराचा पराभव झाला. या प्रभागातून मनसेचा उमेदवार निवडून आला आहे.
काल झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात रिपाइंचे तानसेन ननावरे यांनी देखील प्रकाश मेहतांना रिपाइं उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार धरलं होतं. प्रकाश मेहतांमुळे रमाबाई आणि कामराज नगर या दोन्ही प्रभागात रिपाइंच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला असं ननावरेंनी सांगितलं.
First Published: Thursday, February 23, 2012, 12:41