Last Updated: Monday, March 5, 2012, 12:08
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत पुढचे तीन दिवस 25 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. उर्ध्व वैतरणा या जलवाहिनीचे भांडुप मरोशी जलवाहीनिला जोडण्याचे काम 5 मार्च ते 7 मार्च दरम्यान चालणार आहे. या काळात मुंबईतील काही भाग आणि उपगनरतल्या काही भागात 25 टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
कुलाबा, चंदनवाडी, ग्रॅण्ट रोड, माहीम, माटुंगा, भायखळा, डोंगरी, धारावी, वांद्रे, खार, सांताक्रुझ या भागातल्या नागरिकांना पाणीकपातीचा फटका बसणार आहे.
First Published: Monday, March 5, 2012, 12:08