Last Updated: Thursday, November 10, 2011, 10:21
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबई महापालिकेत आघाडी करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसांत घ्या अन्यथा राष्ट्रवादीची सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे असं सांगत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्व २२७ जागांवर लढण्याची तयारी करण्याचे संकेत दिले गेले. काँग्रेसबरोबर सन्मानानं आघाडी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना १५ दिवसांत निर्णय घ्या असा अल्टिमेटम राष्ट्रवादीनं दिला आहे. एकूणच राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केल्यानं आघाडीत बिघाडीची चिन्हं दिसू लागलीत.
राज्यात होणाऱ्या आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या रणनितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होतेय. पेडर रोडला जयंत पाटलांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. चार दिवसांपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत एक बैठक झाली होती.
First Published: Thursday, November 10, 2011, 10:21