इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी - Marathi News 24taas.com

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.
 
रस्त्यावर टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग रस्त्यावर पसरला होता त्यामुळे अनेक दुचाकी स्वारांचा अपघात होत होते. मोठ्या प्रमाणात तेलाची गळती झाल्याने यावरून अनेक स्वार हे घसरत होते. जवळजवळ २ किमी हा तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे तेथील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता. तसेच तेथील स्थानिक रहिवासी हे देखील वाहनांनाचा अपघात होऊ नये यासाठी चालकांना मार्गदर्शन करत होते.

First Published: Friday, November 11, 2011, 08:23


comments powered by Disqus