शिवस्मारक : मुख्यमंत्री आज देणार उत्तर - Marathi News 24taas.com

शिवस्मारक : मुख्यमंत्री आज देणार उत्तर

www.24taas.com, मुंबई
 
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकावरून मागील आठवड्यात विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला, मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे.
 
अरबी समुद्रातील शिवस्मारकाला परवानगी नाकारल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर, विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला विधानसभेत आणि परिषदेतही धारेवर धरलं होतं. छत्रपतींच्या स्मारकाआड कुठले नियम येत असले तर ते बदलावेत अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र सरकारनं पाठपुरावा केला नसल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता.
 
या आरोपांना उत्तर तसंच स्मारकाबाबतची सरकारची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करणार आहेत.  शिवस्मारकावरून विरोधकांनी गोंधळ निर्माण केल्याने कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे सरकारची कोंडी निर्माण झाली होती. मुख्यमंत्री काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Monday, March 19, 2012, 11:09


comments powered by Disqus