Last Updated: Wednesday, March 21, 2012, 14:23
www.24taas.com, मुंबईमराठी नववर्षाची संध्याकाळ मुंबईकरांसाठी स्पेशल ठरू शकते. लोकप्रिय गीतकार
प्रविण दवणे यांच्या बरोबर गप्पा मारण्याची आणि त्याच्याच गीतांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्याची संधी झी २४ तासतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शनिवारी २४ मार्च रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता
‘जगणेच गाणे असावे!’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात झी सारेगम विजेता विश्वजीत बोरवणकर, अनुज वर्तक, निलेश निर्गुडकर आणि आदिती प्रभुदेसाई प्रविण दवणेंच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना सांगितिक साज चढविणार आहेत.
यासाठी तुम्हांला फक्त एका स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. या स्पर्धेतील २० विजेत्यांना या कार्यक्रमाची मोफत पास देण्यात येणार आहेत. यासाठी तुम्हांला एका प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे.
प्रश्न – मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो?
१)फाल्गुन २) चैत्र ३) वैशाख ४) ज्येष्ठ
* या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यासाठी बातमीच्या खाली मांडा रोख ठोक मत यात अजूक उत्तर, आपलं नाव, पत्ता, फोन-नंबर द्यायला विसरू नका. यातील भाग्यशाली विजेत्यांना जगणेच गाणे असावे या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 14:23