Last Updated: Thursday, March 22, 2012, 07:26
www.24taas.com, मुंबईमुंबईमध्ये आकाशात आज धुळीचे साम्राज्य पसरलंय. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम आहे, हे स्पष्ट झालय. नासानंही या धुळीची दखल घेतली असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या फोटोत ही माहिती देण्यात आलीय. मुंबई, गुजरात आणि उ. भारतात अनेक ठिकाणी हे धुळीचं साम्राज्य पसरलय.
उत्तर आफ्रिका, गल्फ आणि राजस्थानामध्ये आलेल्या धुळीच्या वादळाचा हा परीणाम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याबरोबर ही धूळ आली असल्याचं सांगण्यात येत. मुंबईत विशेषतः उपनगरांमध्ये आकाशात धुळीचं साम्राज्य पसरलं, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
या धुळीमुळे तापमान काही प्रमाणात घट झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. धुळीमुळे काही अंतरावरील इमारती तसंच वाहनंही दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे हवेतील धुळीमुळे नागरिकांमध्ये कुतूहल आणि काळजी व्यक्त केली जात आहे.
तापमानातील फरकामुळे मुंबईतील वातावरणात धूळ आणि धुके निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवेचा वेग काही तासांनी वाढला की ही परिस्थिती बदलेल अशी माहिती हवामान खात्याने सांगितले आहे.
नागरिकांनी काळजी न करण्याचं आवाहन, हवामान खात्याच्या संचालकांनी केलं आहे. तापमानातील अचानक बदलामुळे वातावरणातली धूळ खाली राहत आहे. ही हवा सध्या स्थिर असल्याने ही स्थिती काही काळ राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धुळीचा त्रास असलेल्यांनी घरांच्या बाहेर पडून नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
First Published: Thursday, March 22, 2012, 07:26