Last Updated: Thursday, March 22, 2012, 15:35
www.24taas.com, मुंबई
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. मराठी नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तर शोभायात्रा ही आज गुढीपाडव्याची ओळख बनलेली आहे. मराठमोळ्या वस्तीत आवर्जुन अशा शोभायात्रा काढल्या जातात. कसा कराल साजरा गुढीपाडवा.. गुढीपाडव्याच्या दिवशी. लवकर उठून अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, कडुनिंबाचा पाला, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलं गोडाधोडाचं जेवण करावं.
गुढीपाडवा आपल्याला काय काय शिकवतो... गोड आणि कडू अशा दोन्हीही गोष्टीनां कसं सामोरं जायचं हेच या सणातून शिकता येतं. या दिवशी कडूलिंबाची पाने खाण्यासाठी दिली जातात. कडूलिंब कडू असतो, पण आरोग्यादायी असतो. त्याचे सेवन करण्याने अनेक व्याधीपासून दूर राहता येतं. असचं आपल्या जीवनातही असे काही दु:खदायक प्रसंग येतात... पण त्यामुळे आपण जीवनात निरोगी होत असतो.. पण ज्याप्रमाणे कडू खाल्ल्यानंतरच गोड वस्तूची किंमत समजते. त्याप्रमाणेच आयुष्यात चांगले क्षणही येणार आहेत.. हे लक्षात असू द्या.
First Published: Thursday, March 22, 2012, 15:35