महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध - Marathi News 24taas.com

महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध

www.24taas.com, मुंबई 
 
महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.
 
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीनं पुण्यातले बिल्डर संजय काकडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं या सहाही जणांचा मार्ग मोकळा झाला होता. राष्ट्रवादीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र प्रकाश बिनसाळे यांनीही अर्ज मागे घेतलाय. आज अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. त्यामुळं सहाच उमेदवार रिंगणात राहिल्याने या सहा जणांची बिनविरोध निवड नक्की झालीय.

First Published: Saturday, March 24, 2012, 08:38


comments powered by Disqus