महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध

Last Updated: Saturday, March 24, 2012, 08:38

महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 19:49

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.

संजय काकडे घराकडे, राज्यसभा बिनविरोध!

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 21:37

पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटकेचा निश्वास टाकता येईल. संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्या नंतर त्यांनी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.