Last Updated: Wednesday, November 16, 2011, 07:26
झी २४ तास वेब टीम, मुंबई बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या'रत्न'चा लाभ झाला. मुंबईतील सेव्हपन हिल्स् इस्पितळात ऐश्वर्याने गुटगुटीत गोंडस बाळाला जन्म दिला.
बॉलिवूड स्टार आणि बिग बी अमिताभ 'दादा' झालेत तर अभिषेक बच्चन 'पा' झाला. अमिताभने ट्विट करताना म्हटले आहे की, आय एम दादा टू दि क्युस्ट बेबी गर्ल! तर अभिषेक म्हणाला, इट्स अ गर्ल्स.
अभिषेक-ऐश्वर्याचे चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पहात होते. हा ट्विट वाचल्यानंतर, ट्विटरवर बच्चन कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऐश्वर्या आई होणार असल्याने आत्तापपर्यंत कोटींचा सट्टा लावला गेला होता. ऐश्वरर्याला मुलगा होईल की मुलगी यावर हा सट्टा लागला होता. ऐश्वर्याला कन्या 'रत्न'चा लाभ झाल्याने मुलावर सट्टा लावल्यांचे त्यांचे नुकसान झाले आहे.
First Published: Wednesday, November 16, 2011, 07:26