शिवाजी पार्क मैदान सभांसाठी खुले? - Marathi News 24taas.com

शिवाजी पार्क मैदान सभांसाठी खुले?

www.24taas.com, मुंबई
 
 
मुंबईतील गजबजलेल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानात आता पुन्हा राजकीय आखाड्यांच्या तोफा धडाडणार आहेत. कारण  शिवाजी फार्क हे मैदान पुन्हा राजकीय सभांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी अनुकूलता दाखविली असून या मैदानावरील राजकीय सभांना अडथळा ठरणार्‍या केंद्राच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्रीय फर्यावरण खात्याकडे केली आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली.
 
 
केंद्राच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्रीय फर्यावरण खात्याकडे केली आहे. जाधव यांनी   विधान फरिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे या मैदानावर राजकीय सभांवर बंदी आली असून राजकीय पक्षांमध्ये नाराजी होती. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही बाब लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणली.
 
केंद्राच्या कायद्यानुसार शाळा, रुग्णालये, न्यायालय, धार्मिक स्थळांफासून १०० मीटरचा परिसर शांतता क्षेत्रात येतो. त्याचा मोठा फटका शिवाजी पार्कला बसतो. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अॅडव्होकेट जनरलमार्फत कायद्यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. केंद्र सरकार निश्‍चितच यावर सकारात्मक विचार करेल, असे जाधव यांनी सांगितले.
 
 
शिवाजी पार्कवर असलेले मंदिर मैदानाफासून ८० मीटर अंतरावर आहे. हे मंदिर १०० मीटरच्या बाहेर जावे यासाठी या मंदिराच्या आतील बाजूने २० मीटरचा जॉगिंग ट्रॅक बनवून ती मैदानाची हद्द ठरविता येऊ शकते. त्यासाठी नगरविकास खात्याने तेथील आराखड्यात बदल करावा, अशी सूचना तावडे यांनी केली. त्यावर यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठक घेऊ, असे नगरविकासमंत्र्यांनी स्फष्ट केले.
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Thursday, March 29, 2012, 09:40


comments powered by Disqus