Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:40
मुंबईतील गजबजलेल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानात आता पुन्हा राजकीय आखाड्यांच्या तोफा धडाडणार आहेत. कारण शिवाजी फार्क हे मैदान पुन्हा राजकीय सभांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी अनुकूलता दाखविली असून या मैदानावरील राजकीय सभांना अडथळा ठरणार्या केंद्राच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्रीय फर्यावरण खात्याकडे केली आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली.