Last Updated: Friday, March 30, 2012, 10:48
www.24taas.com, मुंबई मानखुर्द येथे आज शुक्रवारी सकाळी भंगाराच्या गोदामाला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दल नियंत्रण कक्षाने सांगितले. दरम्यान, शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
देवनार डंम्पिंग ग्राऊंडजवळ भंगाराच्या गोदामामध्ये ही आग लागली होती. आग लागल्यानंतर घटनास्थळी १६ अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. तर आठ टॅंकर रवाना करण्यात आले होते. या गोडाऊनच्या शेजारील अनेक गोडाऊन आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.
या घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान आग आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या आगीत किती मालमत्तेचे नुकसान झाले याची माहिती अजून कळू शकलेली नाही.
First Published: Friday, March 30, 2012, 10:48