नशा जीवावर... मुंबई अपघातात तरूणी ठार - Marathi News 24taas.com

नशा जीवावर... मुंबई अपघातात तरूणी ठार

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत पुन्हा एकदा नशेबाज तरूण-तरूणींचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे. नशेत गाडी चालवण्याची  झिंग अपघाताला कारणी भूत ठरली आहे. या अपघातात सात जण जखमी झालेत. मात्र, सुदैवाने ही नशा जीवावर उधार झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, यातील एका तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
 
दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात शिवानी राऊत (२०) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  हा अपघात शुक्रवारी रात्री मुंबईत घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ भागात एका २० वर्षीय युवकाने ह्युंदाई गेट्झ ही गाडी दारुच्या नशेत झाडाला धडकाविली. या गाडीत तीन मुले आणि दोन मुली असे पाच जण होते. जखमी अवस्थेत या मुलीला रात्री रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी शिवानी राऊत हिचे निधन झाले.
 
 
पोलिसांनी या गाडीच्या चालकावर दारू पिऊन गाडी चालविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारने झाडाला धडक दिल्यानंतर एका रिक्षालाही धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला होता. एका पार्टीतून ते परतात असतांना सांताक्रुजच्या एसएनडीटी कॉलेजजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. जखमींवर कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पार्टीतून परतणारे तरूण आणि तरूणी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
व्हिडिओ पाहा

First Published: Saturday, March 31, 2012, 14:08


comments powered by Disqus