रत्नागिरीत सेंट्रल बँकेवर दरोडा : १ ठार, ९.३०लाख लुटले

Last Updated: Friday, November 29, 2013, 07:20

रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.

पेट्रोल पंपच्या आवारात स्फोट, एकाचा मृत्यू

Last Updated: Monday, November 26, 2012, 20:01

अकोल्यातील अशोक वाटिका चौकातील अग्रवाल पेट्रोल पंपावर स्फोट झालाय. य़ा स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पेट्रोल पंपावरील पेट्रोल टाकीच्या दुरुस्तीचे काम करतांना हा स्फोट झालाय.

मुंबईत बस उलटून १ ठार, १६ गंभीर

Last Updated: Friday, April 6, 2012, 23:02

मुंबईतील बांद्रा येथील कलानगर येथे डबलडेकर बस उलटल्याने एकाचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात 3५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे भीती व्यक्त होत आहे. हा अपघात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

नशा जीवावर... मुंबई अपघातात तरूणी ठार

Last Updated: Saturday, March 31, 2012, 14:08

मुंबईत पुन्हा एकदा नशेबाज तरूण-तरूणींचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे. नशेत गाडी चालवण्याची झिंग अपघाताला कारणी भूत ठरली आहे. या अपघातात सात जण जखमी झालेत. मात्र, सुदैवाने ही नशा जीवावर उधार झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, यातील एका तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.