Last Updated: Monday, April 2, 2012, 17:49
www.24taas.com, मुंबई 
मुंबईकरांचा बेस्टचा प्रवासही महागला आहे. बेस्टचे किमान भाडे आता पाच रुपये करण्यात आलं आहे. याआधी बेस्टचं किमान भाडे ४ रुपये होतं, त्यामुळे आता बेस्टची भाडेवाढ तब्बल १ रूपयाने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता बेस्ट बसच्या महागाईलासुद्धा तोंड द्यावं लागणार आहे.
मुंबईकरांचं किमान भाडे एक रुपयाने वाढले आहे. महापालिका निवडणुकीनंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मुंबईत बेस्टच्या भाडेवाढीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यामुळे बेस्टच्या झालेल्या सभेत आज ही भाडेवाढ जाहीर करण्यात आली.
अशी असणार बेस्ट बसची भाडेवाढ : - बेस्टचे किमान भाडे ५ रुपये
- ५ किलोमीटरनंतर भाडे ७ वरून १० रुपये
- ७ किलोमीटरनंतर भाडे ८ वरून १२ रुपये
-१० किमीनंतर १० रुपयांवरून १५ रुपये
अशाप्रकारे बेस्टच्या प्रवासात भाडेवाढ करण्याता आली आहे.
First Published: Monday, April 2, 2012, 17:49