Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:12
www.24taas.com, दीपक भातूसे, मुंबई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गुरुदास कामत समर्थकांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केलं आहे. गुरुदास कामत समर्थक आजी-माजी आमदारांनी त्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. गुरुदास कामत गटाला मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिळावं यासाठी कामत समर्थक आमदार सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. चंद्रकांत हंडोरे, राजहंस सिंह, अलका देसाई आणि जगन्नाथ शेट्टी यांच्यासह आठ ते दहा आजीमाजी आमदारांनी त्यासाठी दिल्ली गाठली आहे.
मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर अवैध मालमत्ता प्रकरणी कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. सध्या मुंबई शहरअध्यक्षपदाचा कार्यभार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला.
First Published: Tuesday, April 3, 2012, 15:12