बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर

Last Updated: Monday, February 4, 2013, 19:24

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे. एसआयटीनं याबाबतचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.

मुंबई अध्यक्षपदासाठी दिल्लीत लॉबिंग

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:12

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गुरुदास कामत समर्थकांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केलं आहे. गुरुदास कामत समर्थक आजी-माजी आमदारांनी त्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे.

रत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची 'कृपा'

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:59

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.

कृपांची संपत्ती जप्ती योग्य – सुप्रीम कोर्ट

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 18:05

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे कृपाशंकर

Last Updated: Sunday, March 11, 2012, 09:56

कुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.

काँग्रेस अजूनही 'कृपा'वंत !

Last Updated: Saturday, March 3, 2012, 10:30

कृपांवर हायकोर्टाच्या आदेशानंतर आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरही कारवाईबाबत काँग्रेसकडून टाळाटाळीचीच उत्तर मिळत आहेत.त्यामुळं काँग्रेस कृपांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न का करतंय, असा सवाल विचारण्यात येतोय.

कृपाशंकर सिंह सर्वात मोठे दलाल- राज ठाकरे

Last Updated: Friday, March 2, 2012, 17:07

सोनिया गांधी आणि अहमद यांच्यापर्यंत अनेकांना पोहचविणारे कृपाशंकर सिंह हे मोठे दलाल असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांचा समोर आलेला घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

कृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!

Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:05

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे

अटकेमुळे घाबरून 'कृपाशंकर पळाले'?.......

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 13:19

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल झालेले कृपाशंकर सिंह सध्या मुंबईबाहेर असल्याची माहिती आहे. ते सध्या दिल्लीत डेरेदाखल असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडं त्यांच्या कुटुंबीय़ांची मात्र चौकशी होणार असल्याचं पोलीस सुत्रांची माहिती आ

कृपाशंकर सिंहांना केव्हाही होऊ शकते अटक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 18:15

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 19:02

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.

कृपाशंकर सिंहांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 16:55

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कृपाशंकर X प्रिया दत्त संघर्ष पेटलाय!

Last Updated: Thursday, February 2, 2012, 19:15

तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झालेत. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करतायत.

काँग्रेसची अजित सावंतांना कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 11:10

मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.