डबेवाले पाच दिवस सुट्टीवर - Marathi News 24taas.com

डबेवाले पाच दिवस सुट्टीवर

www.24taas.com, मुंबई
 
 
मुंबईतील  डबेवाल्यांचा नावलौकिक सातासमुद्रापार गेला आहे. या डबेवाल्यांच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. मात्र, गावातील यात्रांसाठी या डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आता पाच दिवस नोकरी करणाऱ्यांना डबे मिळणार नाहीत.
 
 
बुधवारपासून पाच दिवस डबे येणार नाहीत. त्यामुळं जेवणाची पंचाईत होणार आहे. यात्रांच्या हंगामामुळं डबेवाले गावाकडे गेलेत. त्यामुळं दोन लाख ग्राहकांची पंचाईत होणार आहे. बहुसंख्य डबेवाले पुणे जिल्ह्यातल्या मावळ आणि खेड तसंच अहमदनगर जिल्ह्यातले आहेत. डबेवाले यात्रेला गेल्याने आता पाच दिवस डबे घेणा-यांना दुसरी व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे २ लाख ग्राहक डब्यांवर  अवलंबून आहेत.

First Published: Tuesday, April 3, 2012, 23:34


comments powered by Disqus