फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी - Marathi News 24taas.com

फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी

www.24taas.com, मुंबई
 
 
आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही १२ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
 
 
निलंबित आयएएस अधिकारी  जयराज फाटक आणि माजी माहिती आयुक्त रामानंद तिवारी या दोघांना काल दिवसभराच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. आदर्श  घोटाळाप्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं होते. दरम्यान आदर्श घोटाळ्यातले आरोपी असलेले मुंबईचे तत्कालिन आयुक्त जयराज फाटक आणि काल सीबीआयनं अटक केलेले वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांना निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारने  न्यायालयात दिली आहे.
 
 
गेल्या महिन्यात सीबीआयने निवृत्त मेजर जनरल ए.आर.कुमार, निवृत्त मेजर जनरल टी.के.कौल, आयएएस अधिकारी प्रदीप व्यास, माजी काँग्रेस आमदार कन्हैय्यालाल गिडवानी, निवृत्त डिफेन्स इस्टेट ऑफिस आर.सी.ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छु आणि माजी डेप्युटी सेक्रेटरी नगर विकास पी.व्ही.देशमुखांना अटक केली आहे.
 
 
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 19:15


comments powered by Disqus