'बार', 'बहू' और 'नशा'! - Marathi News 24taas.com

'बार', 'बहू' और 'नशा'!

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं काल रात्री खार भागातील 'कॉस्मिक बार'वर छापा मारून २१ जणांना अटक केली आहे. याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात होता.
 
छापा पडल्यानंतर नशेमध्ये असलेल्या युवक युवतींनी पोलिसांना तसच वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामेनना शिवीगाळही केली. नशेत धुंद झालेल्यांमध्ये 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील 'गोपी बहु'ची भूमिका साकारणारी जिया मानेक ही सुद्धा होती. कारवाईमुळे भान हरपलेल्या जियानं एका कॅमेरामनवर हल्ला देखील केला.
 
विशेष म्हणजे या तरूण-तरूणींचे कुटुंबियदेखील पत्रकारांना शिवीगाळ करत होते. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये १५ युवक आणि २ युवतींचा समावेश आहे. याशिवाय ४ कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. बार मॅनेजर आणि मालक फरार आहेत.
 

First Published: Thursday, April 5, 2012, 08:26


comments powered by Disqus