Last Updated: Friday, April 6, 2012, 09:49
www.24taas.com, मुंबई पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती दर्ग्यावर हाजिरी देण्यास येणार आहेत. पण, या घटनेचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र चांगलाच समाचार घेतला आहे. “भारत देशाबद्दल साफ नियत नसणाऱ्या माणसांची प्रार्थना ऐकली जाणार नाही.” असं बाळासाहेब म्हणाले.
सध्या झरदारी आणि पाकिस्तानी याव्यवस्था यांच्यात वाद चालू आहेत. अशा परिस्थितीत झरदारी अजमेरच्या दर्ग्याला भेट देणार आहेत. याबद्दल बाळासाहेबांनी झरदारी यांची खिल्ली उडवताना मुशर्रफ यांची आठवण करून दिली. या आधी मुशर्रफही सत्तेवर असताना अझमेरला हाजिरी देण्यास आले होते, आणि परत गेल्यावर त्यांच्या हातून सत्ता गेली होती, असा टोला बाळासाहेबांनी लगावला.
‘सामना’ या आपल्या मुखपत्रात ठाकरेंनी लिहीलं आहे, ‘अजमेर शरीफ भारतामधील प्रार्थनास्थळ आहे. अशावेळी भारताचा दुःस्वास करणाऱ्या माणसाची प्रार्थना या प्रार्थनास्थळावर कशी काय स्वीकारली जाणार?’ दोन देशांमधील संबंध सुधारावेत, ‘पाकिस्तान स्पाँसर्ड’ आतंकवाद थांबावा यासाठी झरदारी भारतात येत नाहीयेत असंही बाळासाहेब म्हणाले
First Published: Friday, April 6, 2012, 09:49