Last Updated: Friday, April 13, 2012, 11:50
www.24taas.com, मुंबई आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.
आदर्शची जागा संरक्षण खात्याची की राज्य सरकारची याचा निर्णय आज होईल. जर संरक्षण खात्याची जमीन होती. तर ती कारगील युद्धातील शहीदांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती का ? याचंही उत्तर आज कळेल. दरम्यान, या प्रकरणी निलंबीत आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि रामानंद तिवारी यांची सीबीआय कोठडी १७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आदर्श घोटाळ्याची आखणी बातम्या 
फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडीआदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
.

आदर्श घोटाळा : फाटक, प्रदीप व्यास निलंबितआदर्श घोटाळ्यातले आरोपी असलेले मुंबईचे तत्कालिन आयुक्त जयराज फाटक आणि काल सीबीआयनं अटक केलेले वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांना निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली.
.

आदर्श प्रकरणी अखेर कारवाईआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी सीबीआयने कालपासून अटक सत्र सुरु केलंय...या प्रकरणात राजकारणी सैन्यदल तसेच राज्य सरकारी सेवेतील माजी अधिका-यांचा समावेश आहे..खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक करण्याची तसदी सीबीआयने घेतली नव्हती...मात्र कोर्टाच्या फटका-यानंतर सीबीआयने ही कारवाई केलीय.
.

आदर्श घोटाळा, जेलबाहेरच पाचवी अटकआदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.
.

आदर्श घोटाळा : अशोक चव्हाण, फाटकांना अटक?आदर्श घोटाळाप्रकरणी आता चार जणांना झालेल्या अटकेनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काही तत्कालीन अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
.

कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा अटकआदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.
.

कन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटकमुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोप सौम्य करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली आहे.

आदर्श घोटाळा : चार जणांना अटकआदर्श घोटाळाप्रकरणी अध्यक्ष वांछू आणि प्रवर्तक आर. सी. ठाकूर यांच्यासह ४ जणांना सिबीआयने अटक केली आहे. तर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यातील ही पहिलीच अटक आहे.
.

काँग्रेसमधून कन्नैयालाल गिडवाणी निलंबितकन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज केली.
First Published: Friday, April 13, 2012, 11:50