Last Updated: Friday, April 13, 2012, 21:13
www.24taas.com, मुंबई पुण्यातले विविध घोटाळे उघडकीस आणणारे बांधकाम व्यावसायिक रवी बऱ्हाटे यांनी सरकारची २५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय.
या प्रकरणाची तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. बऱ्हाटे यांची पुण्यात ५०० एकर जमीन आहे. त्या जमिनीची चुकीची किंमत लावून बऱ्हाटेंनी स्टँप ड्यूटीच्या माध्यमातून बऱ्हाटेंनी सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय.
बऱ्हाटे हे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय.
First Published: Friday, April 13, 2012, 21:13