Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:23
www.24taas.com, मुंबई बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वांद्रयातल्या साईप्रसाद इमारतीत घेतलेल्या झडती दरम्यान कृपांच्या घरात बंदुकीची ४००काडतुसं सापडली होती. प्रत्यक्षात शंभर काडतुसं बाळगण्याचा कृपांना परवाना होता. मात्र, परवानगीपेक्षा अधिक काडतूसे बाळगल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस अटक करणार की ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करणार, याचीच चर्चा सुरू आहे.
व्हिडिओ पाहा..
आणखी संबंधित बातम्या

आरक्षित भूखंडावर ‘कृपां’चा साईप्रसाद इमलाकृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.
.
-------------------------------------------------

रत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची ‘कृपा’काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.
.
-------------------------------------------------

‘कृपां’ची चौकशी सुरूच राहणारकृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.
.
-------------------------------------------------

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे कृपाशंकरकुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.
.
-------------------------------------------------

कृपा वाढदिवसात, काँग्रेस पाठीशी घालतेय का?बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कृपाशंकर सिंह मुंबईत उजळ माथ्यानं फिरत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांच्या वाढदिवसालाही कृपाशंकर सिंह यांनी हजेरी लावली.
.
-------------------------------------------------

ये कैसा तरीका है? कृपांचा मीडियाला सवालबेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटकेची टांगती तलवार असली तरी कृपाशंकर सिंह यांची मग्रुरी कायम आहे. तसंच कृपाशंकर सिंह यांच्या सहकाऱ्यांचाही माज कमी झालेला नाही.
.
-------------------------------------------------

कृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोटबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे
First Published: Saturday, April 14, 2012, 16:23