Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:46

झी २४ तास वेब टीम, मुंबई
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे. कापसाच्या दरासाठी सरकारनं सकाळी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक तोडग्याविनाच संपली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कापूस दरवाढीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
दुसरीकडे विरोधकांनी कापूस दरवाढीबाबत आक्रमक पवित्रा घेतलाय. पुढच्या ४८ तासांत सरकारनं निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय. कापूस दरवाढीच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून सरकारच्या केवळ चर्चा आणि बैठका सुरू आहेत. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळं शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप आहे.
First Published: Wednesday, November 23, 2011, 10:46