भाजपाचे आ.गिरीश महाजन यांनी उपोषण सोडलं

Last Updated: Saturday, November 26, 2011, 11:31

जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलं आहे. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र

Last Updated: Saturday, November 26, 2011, 09:10

"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

भाजपाचे आ. गिरीश महाजन यांची प्रकृती चिंताजनक

Last Updated: Friday, November 25, 2011, 12:12

जळगावात गेल्या नऊ दिवसांपासून कापूस दरवाढीसाठी उपोषणास बसलेल्या आमदार गिरीश महाजन यांची प्रकृती आणखी खालावली. महाजन यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:59

कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.

कापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:46

कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.

कापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं

Last Updated: Monday, November 21, 2011, 07:30

जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.