Last Updated: Friday, April 20, 2012, 23:16
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या कफ परेड परिसरात गेल्या सहा महिन्यांत तीन लहान मुलींची हत्या झाल्यानं खळबळ माजली आहे. बुधवारी रात्री गायब झालेल्या तीन वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी या मुलीचा मृतदेह समुद्रात तरंगताना मिळाला.
दिनांक- 20 ऑक्टोबर 2011ठिकाण- कफ परेड, मुंबई.घटना- लहान मुलीची हत्या करुन मृतदेह झाडीमध्ये टाकून दिला. दिनांक 18 जानेवारी 2012ठिकाण- पुन्हा मुंबईतील कफ परेडघटना- आणखी एका लहान मुलीचा मृतदेह सापडला. गुरुवार दिनांक 19 एप्रिल 2012 रोजी कफ परेडमध्येच आणखी एका लहान मुलीची हत्या झाली. या परिसरातून बुधवारी तीन वर्षीय मुलगी गायब झाली आणि तिचाच मृतदेह गुरुवारी समुद्रात तरंगताना आढळला. हत्येपूर्वी या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता. मुंबईतल्या कफ परेड परिसरात गेल्या सहा महिन्यातं तीन लहान मुलींच्या हत्या झाल्यानं या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
ज्या लहान मुलीचा गुरूवारी मृतदेह मिळाला तिची आई आपल्या पहिल्या नव-याला सोडून दुस-या नव-यासोबत राहतेय. या मुलीच्या कस्टडीवरुन तिची आई आणि पहिल्या नवऱ्याचे भांडण सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी तिचा पहिल्या नव-यानं यावरुन धमकीही दिली होती.
पोलिसांनी या घटनेचा उलगडा कऱण्यासाठी आतापर्यंत 200 जणांची चौकशी करण्यात आलीय. परंतू अजून कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळं या घटनांमागे कोणी सीरियल किलर तर नसेल ना, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतंय.
First Published: Friday, April 20, 2012, 23:16