Last Updated: Friday, November 25, 2011, 09:06
झी २४ तास वेब टीम, मुंबई दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या पुतळ्याचं दहन केलं. शरद पवारांवरच्या हल्ल्याचा कालपासूनच राज्यभरात निषेध केला जातोय. आजही ठिकठिकाणी बंद पाळून या हल्ल्याचा निषेध केला जात असतानाच अण्णा हजारेंच्या पुतळ्याचही दहन करण्यात आलं.
कालच्या पवारांवरच्या हल्ल्यानंतर अण्णांनी पत्रकारांपुढे वक्तव्य केलं होतं. अण्णांनी म्हटलं होतं "सिर्फ एकही थप्पाड मारा?" त्या वक्तव्याच्या निषेधार्थ दादरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अण्णांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
First Published: Friday, November 25, 2011, 09:06