विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ - Marathi News 24taas.com

विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत आज पुन्हा गोंधळ झाला. बीएंमएस विषयाचा पेपर काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पोहोचलाय. इंटरनॅशनल फायनान्स या विषयाची परीक्षा होती. तीन वाजता हा पेपर सुरू होणार होता. मात्र काही परीक्षा केंद्रांवर तब्बल तासभर पेपर उशीरा सुरू झाला.
 
मुंबई विद्यापाठीच्या बीएमएसच्या तिस-या वर्षाचा इंटरनॅशनल फायनान्स हा पेपर फुटला. त्यामुळं विद्यापीठानं ऐनवेळी  प्रश्नपत्रिका बदलली. ही प्रश्नपत्रिका अगदी शेवटच्या क्षणी बदलल्यानं काही कॉलेजेसमध्ये पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला उशीर झाला. काही कॉलेजेसमध्ये पेपर उशिरा पोहोचल्यानं, या विषयाची चर्चा झाली. सुरुवातीला तांत्रिक कारण असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात येत होतं. नंतर मात्र पेपरफुटी झाल्याची कबुली विद्यापीठाकडून देण्यात आली.
 
याप्रकरणी चौकशीसाठी आता विद्यापीठानं तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत एस. टी गढदे,  प्रकाश वाणी आणि दिनेश पंजवानी यांचा समावेश आहे. तसचं याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात रितसर पेपरफुटीचा गुन्हाही विद्यापीठाकडून नोंदवण्यात आलाय. यानिमित्तानं मुंबई विद्यापीठातला भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सातत्यानं पेपरफुटीची प्रकरणं समोर येत असल्यानं विद्यापीठाची विश्वासहर्तता धोक्यात आलीय.

First Published: Wednesday, April 25, 2012, 21:48


comments powered by Disqus