Last Updated: Thursday, April 26, 2012, 16:07
www.24taas.com, मुंबई ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केलीये.
अणुशास्त्रज्ञ म्हणून काकोडकर यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. सरकारच्या अणुऊर्जा विभागात अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय. 1998 साली पोखरण इथं भारतानं केलेल्या अणुस्फोट मोहिमेचे ते प्रमुख होते.
काकोडकरांना यापूर्वी पद्मविभूषण पुरस्कारही मिळाला आहे. काकोडकर यांना यापूर्वी प्रतिष्ठेचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. इंडियन न्यूक्लिअर सोसायटीच्या २१ व्या वार्षिक परिषदेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. प्रियदर्शनी अकादमीतर्फे जागतिक पुरस्कारानेही डॉ. अनिल काकोडकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
First Published: Thursday, April 26, 2012, 16:07