Last Updated: Thursday, April 26, 2012, 20:22
www.24taas.com, मुंबई सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.
सरकार लोकपालबाबत उदासीन आहे. आपल्या हातातून सत्ता जाईल अशी भीती सरकारला वाटतेय असं अण्णा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. विकासकामांवर १० पैसेही खर्च होत नाहीत, असा आरोप अण्णांनी केला आहे. आपल्यालाच ही व्यवस्था बदलावी लागणार आहे. त्यासाठी राज्याचा दौरा करून आपण जनतेला जागृत करणार असल्याचं अण्णा म्हणाले.
६ जूनपर्यंत अण्णा आता या मुद्द्यावर राज्यभरात फिरुन जनजागृती करणार आहेत. राज्यात सक्षम लोकायुक्त व्हायलाच हवा, ही मागणी घेत अण्णांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मनसे, भाजप आणि रिपाइंनं अण्णांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय. तर मुख्यमंत्र्यांनी हात झटकत केंद्राच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टोलावला आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांची भेट नाकारली.
First Published: Thursday, April 26, 2012, 20:22