जलविहार बिल्डिंगच्या १२व्या मजल्याला आग - Marathi News 24taas.com

जलविहार बिल्डिंगच्या १२व्या मजल्याला आग

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत कफ परेड भागातल्या एका इमारतीला आग लागली आहे. जलविहार असं या इमारतीचं नाव आहे. १२ मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
 
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग १२ व्या मजल्यावर लागल्याने अग्निशमन दलाचा जवानांना मोठा खटाटोप करावा लागतो आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या रवाना झाल्या असल्या तरीही आग ही मोठ्या प्रमाणात असल्याने ती विझविण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगणं कठीण आहे.
 
आग लागण्यामागचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. तसचं या आगीत कोणात्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.. पण आग लवकरात लवकर अटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.
 
 
 

 
 
 

First Published: Friday, April 27, 2012, 17:15


comments powered by Disqus