नाओ रोबोट मुंबईत दाखल - Marathi News 24taas.com

नाओ रोबोट मुंबईत दाखल

www.24taas.com, मुंबई
 
अपंग मुले आणि वृद्धांची काळजी घेणारा आणि त्यांची कामे करणारा रोबोट मुंबईत दाखल झालाय. फ्रेंडली थेरपीद्वारे बनवण्यात आलेला हा रोबोट लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.
 
अकरा वर्षीय उर्वेशला त्याच्यासोबत खेळण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी एक नवीन मित्र मिळालाय. हा मित्र त्याला एक्जरसाईज कऱण्यासही मदत करतो. उर्वेशच्या या नव्या मित्राचं नाव आहे नाओ. नाओ नावाचा हा रोबोट त्याला शिकवण्यात आलेली सर्व कामे करतो. चेहरा आणि आवाज ओळखण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. हा रोबोट लहानग्यांचा मित्र आणि वृद्ध नागरिकांसाठी मदतनीस ठरू शकतो.
 
साडे पाच किलो वजनाच्या या रोबोटची किंमत आहे दहा लाख रुपये. जर हा भारतात तयार करण्यात येऊ लागल्यास त्याची किंमत तीन लाखापर्यंत  कमी होऊ शकते. या नाओ रोबोटला आणखी कार्यक्षम बनवण्यासाठी त्याच्यावर अजूनही संशोधन सुरु आहे.
 

First Published: Sunday, April 29, 2012, 22:55


comments powered by Disqus