Last Updated: Sunday, November 27, 2011, 06:28
झी 24 तास वेब टीम, मुंबई ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवारांवरील हल्ला अयोग्य असल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर अण्णांच्या वक्तव्याची आपण निंदा करत आहोत. त्यांनी यावेळी अण्णांना फॅसिस्ट असल्याचे म्हटलं.
नवी दिल्लीतील शरद पवारांवरील हल्ल्याबाबत अण्णांनी एकच थपड मारली, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अण्णांनी माफीही मागितली होती. तसेच असे हल्ले का होतात, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे, असेहील अण्णांनी म्हटलं. मात्र, सर्वित्र अण्णांचा निषेध केला जात आहे. लोकपाल बिलाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत डॉ. मुणगेकरांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी अण्णांवर टीका केली.
First Published: Sunday, November 27, 2011, 06:28