Last Updated: Wednesday, May 2, 2012, 11:11
www.24taas.com, वाशी हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेने प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतल्याने हार्बरची रेल्वे सेवा हळूहळू रूळावर आली आहे. आधी एकमार्ग सुरू करण्यास यश आले.
मानखुर्दजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं सकाळी पनवेल ते सीएसटी लोकल सेवेचा खोळंबा झाला. त्यामुळं हार्बरवरील लोकल प्रवाशांचे ऐन ऑफिसच्या वेळेत हाल झालेत. हार्बर मार्गावर आधीच रेल्वे पाच ते सहा मिनिटे उशिरा होती. त्यात मानखुर्दजवळ ओव्हरहेड तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. पनवेल ते सीएसटी लोकल बंद असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांना अर्धा ते पाऊन तास उशिर झाला. काहींनी मानखुर्द येथून बसने प्रवास केला.
First Published: Wednesday, May 2, 2012, 11:11