पतीला चाकूचा धाक, विवाहितेवर बलात्कार - Marathi News 24taas.com

पतीला चाकूचा धाक, विवाहितेवर बलात्कार

www.24taas.com, मुंबई
पतीच्या मानेवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत दहिसरच्या झोपडपट्टीत राहणार्‍या २३ वर्षीय विवाहितेवर सशस्त्र तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र, आरडाओरडा करूनही मदतीला कोणीही धाऊन न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
बलात्कारप्रकरणी सनी सिंग आणि हरी दत्तानी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  त्यापैकी दत्तानी हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे; तर त्यांचा तिसरा साथीदार फरार असून, पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत.बलात्कार झालेली विवाहिता नुकतीच उत्तर प्रदेशातून या झोपडपट्टीतील पतीच्या घरी राहावयास आली होती.  तिचा पती लोकलमध्ये विविध वस्तू विकण्याचा व्यवसाय करतो. त्या व्यवसायानिमित्त पती घरातून बाहेर पडल्यावर ती घरी एकटीच असे. याचा फायदा उठवण्याचा  प्रयत्न सशस्त्र तरुणांनी केला होता.
एकाच झोपडपट्टीत वास्तव्यास असल्याने आरोपींना पती-पत्नी ओळखत होते. अत्याचार करणार्‍यांची नावे त्यांनी सांगितली. त्याप्रमाणे लागलीच हालचाल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. तिसर्‍याचा शोध सुरू आहे, अशी माहिती एम.एच.बी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश किलजे यांनी दिली.

First Published: Wednesday, May 2, 2012, 16:35


comments powered by Disqus