मुंबईतून दहा मुलींचे पलायन , The exodus of women folk from the penitentiary

मुंबईतून दहा मुलींचे पलायन

मुंबईतून दहा मुलींचे पलायन
www.24taas.com,मुंबई

मुंबईतील मानखुर्दच्या महिला सुधारगृहातून दहा मुलींनी पलायन केलंय. सकाळी महिला सुधारगृहाच्या अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पळालेल्या मुलींपैकी एका मुलीला पकडण्यात यश आलयं. गेल्या तीन महिन्यांत सुधारगृहातून मुलींनी पलायन करण्याची तिसरी घटना आहे. या महिला सुधारगृहात राहणा-या महिलांचं जीवन निकृष्ट दर्जाचं असल्याचं हायकोर्टाने स्थापन केलेल्या समितीच्या निदर्शनातून समोर आलंय.

दरम्यान, पनवेल बालगृहातील मुलांना सुरक्षेच्या कारणास्तव मानखुर्द येथील बालगृहात हलवण्यात आले. त्यानंतर मानखुर्द येथे या मुलांच्या शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचे 'अमायकस क्युररी' (न्यायमित्र) आशा बाजपेयी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती बाजपेयी यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने चार आठवड्यांत विशेष शिक्षकांसह शिक्षणाची सुविधा मानखुर्द बालगृहात पुरवावी, असा आदेश खंडपीठाने दिला होता.

First Published: Monday, December 3, 2012, 12:50


comments powered by Disqus