‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!, `The girl and black too ...`; ajinanca cimura

‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!

‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पोलिसांनी एका क्रूर आजीलाच अटक केलीय. मुलगी झाली आणि तीही काळी... हे सहन न झाल्यानं आजीनं आपल्या नवजात नातीचा गळा आवळून तिला ठार केल्याचं, पोलीस तपासात उघड झालंय.

विक्रोळी येथील टागोर नगर इथं अरविंद गोरक्ष हे पत्नी काजोल, आई आणि दोन भावांसह राहतात. गेल्या मंगळवारी, म्हणजेच १७ डिसेंबर रोजी पहाटे अरविंद यांची १४ दिवसांची मुलगी पूजा ही पाळण्यात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळाभोवती पाळण्याची रस्सी आवळल्याच्या खूणा दिसून आल्या होत्या.

पूजाची आई काजोलने तिचा सासरा अशोक गोरक्ष (५५) यांच्यावर पूजाच्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. विक्रोळी पोलिसांनी कल्याण येथे राहणाऱ्या अशोक गोरक्ष यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली होती. मात्र, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. तसेच रात्रीच्या वेळी अरविंदच्या घरात बाहेरील व्यक्ती आत घुसू शकत नसल्याचे प्रात्यक्षिक विक्रोळी पोलिसांनी करून पाहिले होते. त्यामुळे लहानग्या पूजाची हत्या घरातील व्यक्तीनेच केल्याच्या शक्यतेपर्यंत पोलीस पोहोचले होते.

त्यातूनच अरविंद गोरक्ष यांच्यासह राहणार्यांूची पोलिसांनी कसून चौकशी केली असता अरविंदची आई रेखा गोरक्ष यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत तिचा पती अशोक गोरक्ष हा मोठय़ा सुनेसह कल्याणमध्ये राहत होता. त्याला पूजाच्या हत्येप्रकरणात गुंतवण्याबरोबरच मुलगा अरविंद याला मुलगी झाल्याचा व ती काळी असल्याच्या रागातून तिची पाळण्याच्या रस्सीने गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी आजी रेखा हिला अटक केली असून न्यायालयाने तिला २७ डिसेंबरपर्यंत पोलील कोठडी सुनावण्यात आलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 16:58


comments powered by Disqus