Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:26
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्रातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. फेसबुक पोस्टनंतर पोलिसांवर कारवाईसाठी केंद्रातून राज्यावर दबाव आहे. या राजकारणामुळे दबावापोटी पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुढे म्हणतात, `आबांनी, कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`
फेसबुकप्रकरणी राज्य सरकारनं ठाणे पोलिसांविरोधात सुरु केलेल्या कारवाईवर शिवसेनेनं टीका केलीये. सरकारच्या कारवाईमुळं पोलिसांचं खच्चीकरण होत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
गृहमंत्री आर आर पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका राऊत यांनी केली. फेसबुकप्रकरणात सरकारनं चौकशीचा घोळ घातला गेला आहे. याप्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली तर तो पोलीस दलाच्या इतिहासातला काळा दिवस ठरेल अशी टीकाही राऊत यांनी केली.
आर आर पाटलांनी जे कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुक प्रकरणात गमावल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
First Published: Tuesday, November 27, 2012, 15:22