मुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !, The mono rail will run in Mumbai

मुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !

मुंबईतील  मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर - वडाळा या ९ किमीच्या मार्गावरची मोनो रेल्वे ३१ डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांनी स्पष्ट केलंय.

सिंगापूरच्या खाजगी कंपनीकडून मोनोरेल्वेची सुरक्षा तपासणी करण्यात आलीय. त्यानंतर त्यांनी सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यानंतर मोनो रेल्वेमधून प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवलं जाणार आहे.

ही सर्व प्रक्रिया ३१डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएच्या आयुक्तांनी व्यक्त केलाय. त्यामुळे नव्या वर्षी मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करणं शक्य होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, November 27, 2013, 07:16


comments powered by Disqus