‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’, this is not the time to answer criticizers, says r r patil

‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’

‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.

‘पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवला जाणार’ असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलंय. असंही त्यांनी म्हटलंय.

‘ही घटना अत्यंत गंभीर आणि दु:खद आहे... पण, काही तासांतच पोलिसांनी या प्रकरणाचा छ़डा लावलाय.... पीडीत मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करून वकील ठरवला जाईल आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल, याची खबरदारी घेण्यात येईल... त्यामुळे मुंबईत अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा संदेशही लोकांत जाईल’ अशी आशाही आबांनी व्यक्त केलीय.

राज ठाकरेंनी केलेल्या बांगड्यांच्या आवाहनाबद्दल विचारलं असता, ‘अशा गंभीर स्वरुपाची घटना घडल्यानंतर विरोधी पक्षानं अशी टीका करण साहजिक आहे... पण टीकाकारांना उत्तर देण्याची ही वेळ नव्हे... पीडित मुलीला न्याय मिळवून देणं माझं प्राथमिक कर्तव्य आहे... टीकेला उत्तर देण्यापेक्षा मी माझी कर्तव्य करीत राहीन’ असं आबांनी म्हटलंय.

मुंबईत गुरूवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास महिला पत्रकारावर शक्ती मिल परिसरात पाच नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून चार जणांची ओळख पटवण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Friday, August 23, 2013, 21:32


comments powered by Disqus