राहुल गांधी आज मुंबई आणि भिवंडीत today rahul gandhi is in mumbai and bhivandi

राहुल गांधी आज मुंबई आणि भिवंडीत

राहुल गांधी आज मुंबई आणि भिवंडीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज मुंबई दौरा आहे. राहुल गांधी आज सकाळी ते वर्सोवा बीचला जाणार आहेत. राहुल या ठिकाणी कोळी बांधवांशी चर्चा करणार आहेत.

यानंतर ते तेली गल्ली ते अंधेरी उड्डाण पूल असा रोड शो करणार आहेत. राहुल यांची दुपारी भिवंडीतील सोनले गावात जाहीर सभा होणार आहे.

राहुल गांधी यांनी काल खानदेशातील शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कुणी नाही तर या देशातील जनतेने आतापर्यंत देशाची प्रगती केली आहे, असं राहुल गांधी यांनी शिरपूरमध्ये विद्यार्थ्यांशी बोलतांना सांगितलं.

विशेष म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यानंतरची ही राहुल गांधींची पहिलीच सभा औरंगाबादेत बुधवारी झाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 11:10


comments powered by Disqus